Home क्राईम महसूल विभागात चोरट्यांचा दणका; तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळवला

महसूल विभागात चोरट्यांचा दणका; तहसील कार्यालयातून ट्रॅक्टर पळवला


भडगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तहसील कार्यालय परिसराच्या आवारात जप्त करून ठेवलेला विना क्रमांकाचा निळ्या रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉली आणि त्यातील ब्रास वाळू असा एकूण ५ लाख ५४ हजार ७२६ रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, भडगाव तहसील कार्यालयाच्या परिसरात महसूल विभागाने जप्त केलेले वाहने लावून ठेवलेली असतात. महसूल सहाय्यक महादू मच्छिंद्र कोळी (वय ३७, रा. भडगाव) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. २७ मार्च ते ३० मार्च दरम्यान ही चोरीची घटना घडली. चोरट्यांनी संधी साधून विना नंबरचा निळ्या रंगाचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर आणि निळ्या रंगाची ट्रॉली आणि त्यातील एक ब्रास वाळू चोरून नेली. याबबात भडगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ विजय जाधव हे करीत आहे.


Protected Content

Play sound