जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निमखेडी शिवारातील डी लाईट अपार्टमेंटमधून १२ लाख रूपये किंमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना मंगळवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता समोर आली आहे. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. याप्रकरणी सकाळी ११ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील निमखेडी रोडवरील डी लाईट अपार्टमेंट येथे निलेश रमेश पाटील वय ३० हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शासकीय कॉन्स्टॅक्टर म्हणून ते काम करतात. सोमवारी ७ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची कार क्रमांक (एमएच १९ सीझेड ८२००) ही अपार्टमेंटला पार्कींगला लावलेली होती. पार्कींगला लावलेली १२ लाख रूपये किंमतीची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. हा प्रकार नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधून कार काढून पोलीस स्टेशनसमोरून थेट हायवेवर नेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. या घटनेचा व्हिडिओ कारमालक रमेश पाटील यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. जळगाव पोलीस यांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहेत. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फोटो देतो