Home क्राईम पहूर येथील चोरीच्या १५ ते २० दुचाकी जप्त; एलसीबी पथकाची कारवाई

पहूर येथील चोरीच्या १५ ते २० दुचाकी जप्त; एलसीबी पथकाची कारवाई

0
41


पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूर येथे सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावरून चोरीच्या १५ ते २० मोटार सायकली जप्त करण्यात आल्या असून एका संशयीतास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.

याबाबत अधिक माहीती अशी की, लॉकडाऊन सुरु असल्यामुळे पहूर परिसरात मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरु आहेत. या जुगार अड्ड्यावर छापे मारत चोरीच्या सुमारे १५ ते २० मोटर सायकली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केल्या आहेत. या प्रकरणी पिंपळगांव कमानी येथील एका संशयीतास ताब्यात घेण्यात आले असून जप्त केलेल्या मोटारसायकली आणि संशयितास जळगावला रवाना करण्यात आले आहे.

 


Protected Content

Play sound