Home क्राईम कृषी उत्पन्न बाजार समितीतून एकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

कृषी उत्पन्न बाजार समितीतून एकाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली

two wheelar thift

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । औरंगाबाद रोडवरील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आलेल्या एकाची ५० हजार रूपयांची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सविस्तर माहिती अशी की, जुना खेडीरोड परिसरातील विद्यानगर येथील संदीप दिनकर काळे वय ४० हे खासगी नोकरी करतात १२ मार्च रोजी ते पहाटे साडेपाच वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत आले होते. यादरम्यान त्यांनी त्यांची एम.एच.१९ बीझेड ५१३२ या क्रमाकांची दुचाकी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भाजीपाला विभागातील दुकानाच्या मागे  उभी केली होती काम आटोपल्यानंतर दहा वाजेच्या सुमारास उभी केलेली दुचाकी चोरीस गेल्याचे समोर आले. याप्रकरणी संदीप काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मंगळवारी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस नाईक गणेश शिरसाळे करीत आहेत.


Protected Content

Play sound