रावेर प्रतिनिधी । नेहते खिरवड परीसरात रात्री चोऱ्या झाल्याच्या घटना घडल्या असून याबाबत नागरीकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
रावेर तालुक्यातील नेहते येथे किसान तोल काटामधुन अज्ञात चोरट्याने सहा हजार रुपये रोख तर शेजारीच असलेल्या केळी गृप मधुन भांडे व होम थेटर चोरुन नेले आहे. तसेच सोपान बाबुराव पाटील यांच्या शेतातुन नळ्याचे बंडल चिरुन नेले असून खिरवड येथून प्रकाश लासुरकर यांची एक्वाची पाण्याची मोटर चोरुन नेले आहे असा एकूण विस् ते पंचविस हजाराचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरुन नेल्याची घटना घडली आहे याबाबत रावेर पोलिसात महेंद्र पाटील नेहते (रा रावेर) यांच्या फिर्यादी वरुन अज्ञात चोरट्या विरुध्द गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या मार्गदर्शना खाली हवलदार अजुन सोनवणे करीत आहेत.