जळगाव प्रतिनिधी | जळगाव शहरातील ‘फुले मार्केट’ येथील जनरल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचा उघडकीला आला असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव शहरातील ‘फुले मार्केट’ येथील जनरल स्टोअर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री फोडून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचा प्रकार गुरुवार, दि.२७ जानेवारी रोजी सकाळी उघडकीला आला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, “विकास प्रकाशलाल मकडिया (वय-३३) रा. गणेश नगर, बाबा हरदासराम मंगल कार्यालयाजवळ, जळगाव हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे शहरातील फुले मार्केटमध्ये ‘दृष्टी जनरल सौंदर्यप्रसाधने’ या नावाचे दुकान आहे. बुधवार, दि. २६ जानेवारी रोजी दिवसभर काम आटोपून रात्री ९ वाजता दुकानातील कामगार दानेश मंजूर पिंजारी आणि शेख मुदत्स्सर शेख साबीर चौधरी या दोघांनी दुकान बंद करून घरी गेले.
मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून दुकानात ठेवलेल्या ड्राव्हरमधून १ लाख २ हजार रुपयांची रोकड आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरुन नेल्याचा प्रकार महापालिकेचे सफाई कामगार यांना गुरुवार, दि. २७ जानेवारी रोजी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुकान पडल्याचे दिसून आले. याबाबत दुकान मालक विकास मकडीया याना माहिती दिली. त्यांनी लागलीच दुकानावर धाव घेतली असता, त्यांच्या दुकानातील सामान अस्तव्यस्त पडलेला दिसला तर ड्रावरमधील रक्कम आणि सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली, त्यांच्या तक्रारीवरून सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.