Home क्राईम बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला ऐवज  

बंद घर फोडून चोरट्यांनी लांबविला ऐवज  

0
78

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील उटखेडा येथील एकाचे बंद घर फोडून एक लाख रूपयांची रोकड लांबविल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “रावेर तालुक्यातील उटखेडा येथील प्लॉट भागातील रहीवासी मिनाबाई राजू तडवी या वाघझिरा येथे त्यांच्या खाजगी कामानिमित्त गेल्या होत्या. ही संधी साधून रविवार, दि. २२ मे रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराचे कडीकोयंडा तोडून आत प्रवेश करत चोरट्याने पत्रीपेटीमध्ये ठेवलेले १ लाख रुपये ३ हजार रुपये किमतीच्या सहा भार चांदीच्या पाटल्या ऐवज लांबविला.

याप्रकरणी मिनाबाई तडवी यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फौजदार सचिन नवले व सहकारी पुढील तपास करीत आहे.


Protected Content

Play sound