जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोरीच्या दुचाकी घेवून फिरणाऱ्या विक्रम भिका चव्हाण (वय २७, रा. वसंतवाडी, ता. जळगाव) याच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वसंतवाडी येथून गुरुवारी २७ मार्च रोजी दुपारी तीन वाजता अटक केली. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शहरातील वेगवेगळ्या भागातून चोरी केलेल्या चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील विक्रम चव्हाण हा चोरीच्या दुचाकी घेवून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, अतुल वंजारी, अक्रम शेख, विजय पाटील, हरीलाल पाटील, प्रवीण भालेराव यांचे पथकाने संशयित विक्रम चव्हाण याला त्याच्या घरून ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरलेल्या चार दुचाकींची कबुली देत त्या दुचाकी काढून दिल्या. त्या दुचाकी पोलिसांनी ताब्यात घेवून शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केल्या आहे. पुढील तपास शहर पोलीस करीत आहे.