चोरीच्या पाच दुचाकिंसह चोरट्याला अटक; जळगाव एलसीबीची कारवाई

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोरीच्या दुचाकी विक्रीसाठी आलेल्या दीपक प्रेमसिंग सोळंके (रा. वरठाण, ता. सोयगाव, ता. सोयगाव, जि. छत्रपती संभाजी नगर) याच्या एमआयडीसी पोलिसांनी अजिंठा चौकातून अटक केली आहे. त्याच्याकडून पाच चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरात चोरीची दुचाकी विक्रीसाठी संशयित दीपक सोळंके हा चोरटा येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश बारी, विशाल कोळी, राहुल रगडे, फिरोज तडवी यांचे पथक रवाना केले. या पथकातील कर्मचाऱ्यांनी तांत्रिक विश्लेष करीत चोरीची दुचाकी घेवून रविवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अजिंठा चौफुली परिसरात आलेल्या संशयित चोरट्याच्या सापळा रचून मुसक्या आवळल्या.
संशयित चोरट्याजवळ असलेल्या दुचाकीचीबाबत चौकशी केली असता, सुरुवातीला तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. मात्र त्याला खाक्या दाखविताच त्याने ही दुचाकी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याची कबुली दिली. त्याने त्याचसोबत जळगाव शहरातून तीन, छत्रपती संभाजी नगरातून एक आणि अडावद येथून एक अशा पाच दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी त्या जप्त केल्या असून संशयिताला शहर पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.

Protected Content