जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील ‘जय भोले’ नावाच्या कंपनीतून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल असा १ लाख ५२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविणाऱ्या संशयित आरोपीला भोपाळ येथे अटक करण्यात आली आहे.
शहरातील एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीतून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल असा १ लाख ५२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविणाऱ्या संशयित आरोपीला शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी भोपाळ येथून अटक केली आहे. शनिवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, “भुसावळ शहरातील सिंधी कॉलनी येथील व्यापारी अमर दयालदास कटियारा वय ४२ यांची एमआयडीसीतील जी २० सेक्टर येथे जय भोले नावाची कंपनी आहे. कंपनी बंद असतांना बुधवार ९ फेब्रुवारी रोजी रात्री चोरट्यांनी कंपनीचे कुलूप तोडत कंपनीत प्रवेश करीत कंपनीच्या ऑफिसमधील १ लाख ५२ हजारांची रोकड व मोबाईल असा ऐवज चोरुन नेला होता. याप्रकरणी अमर कटियारा यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
शहरातील एमआयडीसीतील जी-सेक्टरमधील जय भोले नावाच्या कंपनीतून चोरट्यांनी रोकडसह मोबाईल असा १ लाख ५२ हजार ५०० रूपयांचा ऐवज लांबविणाऱ्या संशयित आरोपीला शुक्रवारी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी भोपाळ येथून अटक केली आहे. शनिवार १२ फेब्रुवारी रोजी दुपारी न्यायालयात हजर केले असता त्याला १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सहाय्यक फौजदार अतुल वंजारी यांनी चौकशी केली असता भिमकुमार परमहंश यादव रा. बिहार याला भोपाल येथून शुक्रवार ११ फेब्रुवारी रोजी दुपारी अटक केली आहे. ही कारवाई एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोना हेमंत कळसकर, पोना सुधीर साळवे, पोकॉ चंद्रकांत पाटील यांनी केली. संशयित आरोपी भिमकुमार यादव याला जिल्हा न्यायालयातील न्यायमुर्ती प्रीती श्रीराम यांच्या न्यायालयात हजर केले असता १६ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे, रतिलाल पवार करीत आहे.