Home क्राईम बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला !

बंद घर फोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांचा ऐवज लांबविला !


चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील मुंदखेडा रोड परिसरात एका बंद घराचा कडीकोंडा आणि कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशीकी, चाळीसगाव येथील मुंदखेडा रोडवरील रहिवाशी रविंद्र वाल्मिक महाजन (वय ४२) हे व्यवसायाने बांधकाम कंत्राटदार आहेत. २५ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडून घरातून रोकड आणि सोन्याचांदीचे दागिने असा एकुण २ लाख ९२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. रविंद्र महाजन यांना सकाळी गुरूवारी २७ मार्च रोजी सकाळी घरफोडी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला.

पोलीसांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला, याबाबत रविंद्र महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound