येऊ शकतो कोरोनाचा नवीन व्हेरियंट

मुंबई- लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | कोरोनाचा प्रकोप कमी होत असला तरी या व्हायरसचा नवीन व्हेरिएंट जगात कधीही येऊ शकतो. अशा स्थितीत सध्या कोरोनाबाबत गाफील राहू नका असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.

 

कोरोनाचा प्रकोप पुन्हा उदभवू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. या संदर्भात कोविड तज्ज्ञ डॉ जुगल किशोर म्हणाले की, कोरोना व्हायरस सतत स्वतःला बदलत राहतो. उत्परिवर्तनामुळे, हा व्हायरस नवीन व्हेरिएंटमध्ये बदलू शकतो. जर हा व्हेरिएंट वेगानं पसरला आणि लस किंवा नैसर्गिक प्रतिकारशक्तीला मागे टाकलं तर कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात. दरम्यान नवीन लाट येण्याची शक्यता फारच कमी आहे, कारण लोकसंख्येचा मोठा भाग ओमायक्रॉन व्हेरिएंटनं संक्रमित झाला आहे. लोकांमध्ये संसर्गाविरूद्ध प्रतिकारशक्ती असते. अशा परिस्थितीत जोपर्यंत धोकादायक व्हेरिएंट येत नाही. तोपर्यंत पुढची लाट येणार नाही. पण यामुळे लोकांना असं वाटू नये की कोरोना आता कायमचा संपला आहे.

 

तर याच संदर्भात आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव कुमार अग्रवाल म्हणतात की, जगात एका आठवड्यासाठी सरासरी १५ लाखांहून अधिक प्रकरणे दररोज येत आहेत. कोरोनाची साथ अजून संपलेली नाही हे लोकांनी समजून घेतले पाहिजे. अशा परिस्थितीत लोकांनी सावधगिरी बाळगणं अत्यंत आवश्यक आहे.  देशात कोरोनाच्या प्रकरणांमध्ये ५५.७ टक्क्यांनी घट झाली आहे. मृत्यूदरही ७६.६ टक्क्यांनी खाली आला आहे. भारतात लसीकरणाचा खूप फायदा झाला आहे. यामुळे तिसर्‍या लाटेत मृत्यूची प्रकरणे आणि दैनंदिन प्रकरणे देखील दुसर्‍या लाटेच्या तुलनेत खूपच कमी होती. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेपेक्षा तिसर्‍या लाटेचे शिखर लवकर आले. मात्र या पुढे देखील प्रकोप येऊ शकतो. यामुळे सावधगिरी आवश्यक असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

Protected Content