राज्यात केवळ सत्तांतर होतय पण परिवर्तन नाही : व्ही.पी. पाटील

जामनेर, प्रतिनिधी ।  राज्यात निवडणुकीच्या माध्यमातून केवळ सत्ता बदलुन सत्तांतर होताना दिसते पण परिवर्तन होत नाही असा आरोप  राष्ट्रवादी पक्षाचे माजी जिल्हा सरचिटणीस व्ही.पी.पाटील यांनी आज घेतलेल्या पत्र परिषदेत केला. 

व्ही. पी. पाटील यांनी पत्रकार परिषदेत पुढे सांगितले की, जिल्ह्यासह महाराष्ट्रात गाजलेल्या भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य आरोपी राजरोसपणे मोकाट आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होऊन सर्व सामान्य ठेवीदारांना न्याय मिळणार का ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यांनी आघाडी सरकारच्या भुमीकेबाबत सांशकता व्यक्त करत केवळ सत्तांंतर होतेय परिवर्तन नाही. आता सत्तांतरची नाही तर परिवर्तनाची आवश्यकता आहे. युती सरकारच्या काळात सहकार मंत्री असताना गुलाबराव पाटील यांनी जामनेरच्या एका सभेत बोलताना सांगितले होते की, माझ्या हातात फक्त चिडीमार बंदुक दिली आहे.  काय करू शकणार ?  मात्र आता आघाडी सरकारच्या कार्यकाळात गुलाबराव पाटील यांच्याकडे मोठी बंदुक आहे.  आता त्यांनी जिल्ह्यातील बी.एच.आर.च्या सर्व ठेवीदारांच्या समस्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून जाणून घेत मोठ्या बंदुकीचा वापर करून कायद्याच्या माध्यमातून  न्याय मिळवुन द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करत तस काही होताना दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली.   यामुळे आघाडी सरकारचीही प्रतीमा मलीन होत आहे. या घोटाळ्यामध्ये बड्या राजकीय घटकांचाही हात असल्याचे पुरावे संबधीत खात्याने हस्तगत केले असुनही एवढी दिरंगाई का होत आहे ? सर्व सामान्य ठेवीदारांच्या मेहनतीच्या जमा पुंजीवर या पतसंस्थेच्या माध्यमातून धनदांडग्या लोकांनी हात मारत लाखोंंचे कर्ज काढून बुडवले आहे तर दुसरीकडे सर्व सामान्य ठेवीदारांचे संसार उघड्यावर आले आहे. या प्रकरणात बड्या राजकीय नेत्यांचे हात बरबटलेले आहेत याचे पुरावे असुनही त्या घटकांवर कायदेशीर कारवाई का होत नाही.असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला. 

 

Protected Content