वैयक्तिक कामानिमित्त मुंबईत…गिरीशभाऊंची भेट घेण्याचा प्रश्नच नाही : गुलाबराव देवकर

gulabrao deokar

जळगाव : विजय पाटील

माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि माजी आमदार मनीषदादा जैन यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर दोघांचा भाजप प्रवेश होणार असल्याच्या बातमीने जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली होती. परंतू मी वैयक्तिक कामानिमित्त मुंबईत…गिरीशभाऊंची भेट घेण्याचा प्रश्नच नाही, अशा स्पष्ट शब्दात गुलाबराव देवकर यांनी भाजप प्रवेशासंबंधीचे वृत्त ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलतांना फेटाळून लावले आहेत.

 

या संदर्भात अधिक असे की, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर आणि माजी आमदार मनीषदादा जैन यांनी मुंबईत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे वृत्त जिल्ह्यात पसरले होते. या संदर्भात माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, मी आणि मनीषदादा आपापल्या खाजगी कामानिमित्त मुंबईत आलो होतो. भेट झाल्यामुळे आम्ही एकत्र एका हॉटेलमध्ये फक्त जेवण केले. त्यामुळे माझी आणि गिरीशभाऊंची भेट घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. राहिला मनीषदादांचा विषय तर त्यांनी आपल्या खाजगी कामानिमित्त गिरीशभाऊंची भेट घेतली किंवा नाही, हे मला माहित नाही.

 

दरम्यान, ८ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेत देवकर हे भाजप प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा होती. परंतू खुद्द देवकरांनी आता हे वृत्त फेटाळून लावल्यामुळे या विषयावर पडदा पडला आहे. परंतू अंतगर्त पक्षाअंतगर्त गटबाजी देवकर प्रचंड अस्वस्थ असून त्यांच्या मतदार संघात त्यांना पाहिजे तसं काम विरोधी गटाकडून केले जाऊ देत नसल्यामुळे देवकर नाराज आहेत. थोड्याच दिवसांपूर्वी मुलाखतीच्या वेळेस राष्ट्रवादीत वाद उफाळून आला होता.

 

Protected Content