मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नाही.
इच्छुक उमेदवारांनी विविध संगणक केंद्रांवर जाऊन ऑनलाइन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात केलेली आहे. प्रत्यक्षात तहसील कार्यालयात मात्र आज एकही उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.ऑनलाइन अर्ज दाखल करण्यासाठी नेट प्रॉब्लेम हा सर्वात मोठी समस्या उमेदवारांसमोर दिसून येत आहे .दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या 28 अधिकाऱ्यांना आज मुक्ताईनगर तहसीलच्या सभागृहामध्ये प्रशिक्षण देण्यात आले. या प्रसंगी तहसीलदार श्वेता संचेती यांनी अधिकाऱ्यांना विविध प्रकारचे अर्ज छाननी तसेच प्रक्रिया संदर्भात प्रशिक्षण दिले.