आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना फोडण्याचे काम केले. हे राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाहीतर देवेंद्र फडणवीस चालवत आहे. फडणवीसांना माझे उपोषण सोडवायला यायचे होते, पण त्यांना येऊ दिले नाही, तर अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दौरे रद्द झाल्याने फडणवीसांचा आपल्यावर राग आहे. अनेकांनी भाजप फडणवीसांमुळे सोडली. अशी भूमिका घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले. मराठा समाज संपविण्याचे काम सुरू आहे. मला मारण्यासाठभ् सलाईनमधून विष देण्याचा प्रयत्न होऊ शकतो, म्हणून मी सलाईन घेत नाही आहे, मला संपवण्याचा फडणवीसांचा डाव आहे. मी फडणवीसांना पुरून उरेल, त्यांनी 5 महिने झाले तरी मराठयांवर असलेले गुन्हे मागे घेण्यात आले नाही. मी जर रस्त्यात मेलो तर मला फडणवीसांच्या दारात नेऊन टाकून दया असे जरांगे पाटील यांनी सांगितले. बारसकर हे देवेंद्र फडणवीसांसोबत आहे.
मराठा समजाला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे सर्व फडणवीस करत आहे आणि त्यात शिंद आणि अजित पवारचे लोकही त्यांच्या सोबत आहे. मी कुठल्याही पक्षाचा नाही आहे, कोणाचेही काम करत नाही, मी फक्त माझ्या समाजाचा आहे आणि ओबीसीतून आरक्षणाची मागणी करतो आहे. सरकार सगेसोयरे लागू करत नाही. फडणवीसांच्या मनात असते तर सगेसोयरे लागू झाले असते. फडणवीस ब्राहमणी कावा दाखवत आहेत, त्याच्यामुळेच शिंदनी शिवसेना, अजित पवारांनी राष्ट्रवादी आणि अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सोडली ते आपल पक्ष सोडू शकत नव्हते पण फडणवीसाच्या काव्यामुळे त्यां सर्वांनी आपआपला पक्ष सोडला. फडणवीसांमुळे खडसे, पटोल यांनी भाजप सोडली. बैठक संपल्यानंतर सांगर बंगल्यावर पायी येणार, संपवून दाखवा असा इशारा मराठा समाजाचे आंदोलक प्रमुख मनोज जरांगे यांनी दिला आणि देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोपही यावेळी केले.
मला संपवण्याचा डाव आहे; मनोज जरांगे यांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप
10 months ago
No Comments