Home राजकीय राज्यात ३३ मतदार संघातील लढती निश्चित

राज्यात ३३ मतदार संघातील लढती निश्चित


 

which party will yield the cm of maharashtra

 

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात लोकसभा निवडणुकीत युती आणि आघाडीमध्येच खरी लढत असेल. शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीने टप्प्याटप्प्याने आपापल्या पक्षांचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार आतापर्यंत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांपैकी ३३ ठिकाणच्या लढती निश्चित झाल्या आहेत. मतदारसंघ निहाय प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमधील लढती अशा आहेत. आता  केवळ १५ मतदार संघाचे चित्र स्पष्ट होणे बाकी आहे.

नंदुरबार :- डॉ. हीना गावित (भाजपा) वि. के. सी. पाडवी (काँग्रेस)
धुळे :- डॉ. सुभाष भामरे (भाजपा) वि. कुणाल पाटील (काँग्रेस)
जळगाव :- स्मिता वाघ (भाजपा) वि. गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी)
बुलडाणा :- प्रतापराव जाधव (शिवसेना) वि. डॉ. राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी)
वर्धा :- रामदास तडस (भाजपा) वि. अॅड. चारुलता टोकस (काँग्रेस)
नागपूर :- नितीन गडकरी (भाजपा) वि. नाना पटोले (काँग्रेस)
गडचिरोली-चिमूर :- अशोक नेते (भाजपा) वि. डॉ. नामदेव उसेंडी (काँग्रेस)
चंद्रपूर :- विनायक बांगडे (काँग्रेस) वि. हंसराज अहिर (भाजपा)
यवतमाळ -वाशिम :- माणिकराव ठाकरे (काँग्रेस) वि. भावना गवळी (शिवसेना)
परभणी :- राजेश विटेकर (राष्ट्रवादी) वि. संजय जाधव (शिवसेना)
जालना :- रावसाहेब दानवे (भाजपा) वि. विलास औताडे (काँग्रेस)
औरंगाबाद :- चंद्रकांत खैरे (शिवसेना) वि. सुभाष झांबड (काँग्रेस)
दिंडोरी :- धनराज महाले (राष्ट्रवादी) वि. डॉ. भारती पवार (भाजपा)
नाशिक :- समीर भुजबळ (राष्ट्रवादी) वि. हेमंत गोडसे (शिवसेना)
भिवंडी :- कपिल पाटील (भाजपा) वि. सुरेश टावरे (काँग्रेस)
कल्याण :- श्रीकांत शिंदे (शिवसेना) वि. बाबाजी पाटील (राष्ट्रवादी)
ठाणे :- राजन विचारे (शिवसेना) वि. आनंद परांजपे (राष्ट्रवादी)
उत्तर मध्य मुंबई :- पूनम महाजन (भाजपा) वि. प्रिया दत्त (काँग्रेस)
दक्षिण मध्य मुंबई :- राहुल शेवाळे (शिवसेना) वि. एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
मुंबई दक्षिण :- मिलिंद देवरा (काँग्रेस) वि. अरविंद सावंत (शिवसेना)
रायगड :- अनंत गीते (शिवसेना) वि. सुनील तटकरे (राष्ट्रवादी)
मावळ :- पार्थ पवार (राष्ट्रवादी) वि. श्रीरंग बारणे (शिवसेना)
बारामती :- सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी) वि. कांचन कुल (भाजपा)
शिरूर :- शिवाजी आढळराव पाटील (शिवसेना) वि. अमोल कोल्हे (राष्ट्रवादी)
अहमदनगर :- डॉ. सुजय विखे (भाजपा) वि. संग्राम जगताप (राष्ट्रवादी)
शिर्डी :- सदाशिव लोखंडे (शिवसेना) वि. भाऊसाहेब कांबळे (काँग्रेस)
बीड :- डॉ. प्रीतम मुंडे (भाजपा) वि. बजरंग सोनावणे
उस्मानाबाद :- ओमराजे निंबाळकर (शिवसेना) वि. राणा जगजितसिंह (राष्ट्रवादी)
लातूर :- सुधाकर शृंगारे (भाजपा) वि. मच्छलिंद्र कामंत (काँग्रेस)
सोलापूर :- सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस) वि. जयसिद्धेश्वर स्वामी (भाजपा)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग :- विनायक राऊत (शिवसेना) वि. निलेश राणे (महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष)
हातकणंगले :- धैर्यशील माने (शिवसेना) वि. राजू शेट्टी (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
कोल्हापूर :- धनंजय महाडिक (राष्ट्रवादी) वि. संजय मंडलिक (शिवसेना)

 

 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound