पहुर ता.जामनेर (वार्ताहर)। गेल्या अनेक दिवसांपासून वाकोद-पहुर रस्त्याचे काम रखडले आहे. अनेक वेळा रस्त्याचे काम सुरू होते आणि बंद केले जाते. ठिकठिकाणी रस्ता खोदून ठेवला आहे. वाहतूकीसाठी पर्यायी (सर्व्हिस रस्ता) केला आहे. परंतु रस्त्याच्या कडेला माती टाकून दबायी न केल्याने अवजड वाहनांच्या वजनाने रस्ता धसला जात आहे. असाच प्रकार आज १५ मे रोजी सांयकाळी ६ वाजेच्या सुमारास घडला.
पहूर कडूनऔरंगाबाद कडे जाणाऱ्या एका कंटेनर ला समोरून येणाऱ्या वाहनाने दाबल्याने कंटेनर चालकाने कंटेनर साईडला घेतले. रस्त्याच्या साईडला माती धसलेली असल्याने कंटेनर रस्त्याच्या कडेला पलटी झाला. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. या रस्त्यावर हे अपघात नित्याचे झाले असून या अपघातांना ठेकेदार व अधिकारी जवाबदार असून ठेकेदार या रस्त्याच्या परिस्थिती कडे दूर्लक्ष करीत आहे तर संबधित अधिकारी याकडे ढूंकूनही पाहत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर्यायी रस्त्यावर पाणी न केल्यामुळे आणि मातीमुळे धुळीचे लोण उठत आहे. या धुळीने वाहने चालविणे जिकिरीचे झाले आहे. रस्त्यावर ईतर ठिकाणी ही खड्डे च खड्डे पडले असून या रस्त्याची सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे देखील गंभीर समस्येकडे दूर्लक्ष होत आहे. तरी संबंधीत अधिकारी यांनी लक्ष द्यावे व योग्य ती तजवीज करावी अशी मागणी होत आहे.