रावेर (प्रतिनिधी) तालुक्यातील सिंदखेडा येथील एका शेतातल्या विहीरीतुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने पाण्याचा पंप चोरुन नेल्याची घटना घडली असुन याबाबत रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक वृत्त असे की, रमेश पाटील यांच्या रावेर शिवारातील शिंदखेडा ते मुंजलवाडी दरम्यान असलेल्या शेतातील गट क्र . 1340 / 2 मधुन कोणीतरी अज्ञात चोरट्याने 5000 रुपये किंमतीचा फाल्कन कंपनीचा 5 HP समुराई पंप चोरुन नेला आहे. याबाबत रावेर पोलिसात रविंद्र पाटील यांच्या फिर्यादी वरुन भादवि . कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास पो. कॉ. जितेंद्र पाटील करीत आहेत.