जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील उस्मानियॉ पार्क येथील एका तरुणाची ३५ हजार रुपये किमतीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना सोमवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता समोर आली आहे. या संदर्भात मंगळवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, एजाज रफिक शेख वय-३३, रा. उस्मानियॉ पार्क जळगाव हा तरुण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून मेकॅनिकचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत असतो. सोमवारी २९ जुलै रोजी रात्री १० वाजता त्याच्या घरासमोर त्याची दुचाकी (एमएच १९ डीके २१३) ही घरासमोर पार्किंगला लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. ही घटना उघडकीला आल्यानंतर त्याने सर्वत्र दुचाकीचा शोध घेतला. परंतु तुझ्यासाठी कुठेही मिळून आले नाही. अखेर बुधवारी ३१ जुलै रोजी दुपारी ३.३० वाजता जळगाव शहर पोलिसात धाव घेवून तक्रार देण्यात आली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल योगेश पाटील हे करीत आहे.