Home Cities रावेर जप्त केले वाळूच्या दोन ट्रॉल्याची चोरी; दोघांवर गुन्हा दाखल

जप्त केले वाळूच्या दोन ट्रॉल्याची चोरी; दोघांवर गुन्हा दाखल

FIR

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील निंभोरा सिम शिवारातून बेकायदेशीर वाळूची वाहतूक करणारे ट्रक्टर महसूल विभागाने जप्त केले होत. जप्त केलेले वाळूचे ट्रक्टर आणि २ ट्रॉल्या चोरून नेल्याप्रकरणी निंभोरा पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, रावेर तालुक्यातील निंभोंरा शिवारात बेकायदेशीर वाळूची वाहतूक करत असतांना तलाठी भाग्यश्री किशोर बर्वे यांनी कारवाई करत ट्रक्टरच्या दोन ट्रॉल्या निंभोरा सिम विटवा रस्त्याला लागून मोकळ्या जागेत जमा करण्यात आले होते. ही कारवाई १४ ऑगस्ट रेाजी रात्री ८ वाजता केली होती. दरम्यान मोकळ्या जागेवर लावलेले ट्रक्टरच्या दोन ट्रॉल्या संशयित आरोपी शामा एकनाथ अटकाळे आणि ब्रिजलाल रामू  सवर्णे रा. निंभेरा ता. रावेर यांनी चोरून नेले. याप्रकरणी तलाठी भाग्यश्री बर्वे यांच्या फिर्यादीवरून निंभोरा पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ बापू पाटील करीत आहे.

 


Protected Content

Play sound