जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील दोन शेतकऱ्यांच्या मालकीच्या ३० हजर रूपये किंमतीचे दोन बैलांची चोरी झाल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, किरण भिला चौधरी (वय-४३) रा. पेठ भाग नशिराबाद हे शेतकरी करून शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान त्यांच्याकडे शेती करण्यासाठी दोन बैल आहे. त्यांच्या गुरांच्या गोठ्याच्या बाजूला शेजारी राहणारे माधव धनगर यांच्याकडे बैल आहेत. किरण चौधरी यांनी १४ जुलै रोजी दिवसभर शेतात काम करून सायंकाळी त्यांच्या गोठ्यात बैलाला बांधून चारापाणी दिले. त्यानंतर ते घरी निघून गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी किरण चौधरी आणि माधव धनगर यांच्या मालकिचे प्रत्येकी एक बैल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे काल गुरूवारी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. त्यांनी गावात व शेतात बैलांची शोधाशोध केली परंतू दोनही बैल मिळून आले नाही. दोघांनी दुपारी ३ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांवर बैल चोरीची तक्रार दिली आहे. दोघांच्या तक्रारीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहन चौधरी करीत आहे.