अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरात घटनेत सदगुरू नगर परिसरातून एकाच रात्री दोन जणांच्या दुचाकी चोरी झाल्याची घटना ३ ऑक्टोबर सकाळी ७ वाजता रोजी समोर आली आहे. अशी घटना दुसऱ्यांदा घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील अंकित मोहनसिंग गुर्जर वय २० आणि चेतन सुभाष पाटील वय ४२ हे एकच गल्लीत वास्तव्याला आहे. २ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी अंकित गुर्जर यांची दुचाकी क्रमांक (एमपी ४१ झेडई ८०८३) आणि चेतन पाटील यांची दुचाकी क्रमांक (एमएच ०५ ईई ३२१६) यांच्या दुचाकी घरासमोर पार्किंग लावलेली दुचाकी चोरून नेली. ही घटना ०३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ विनोद सोनवणे हे करीत आहे.