अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर शहरातील जय योगेश्वर कॉलनी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकी चोरूनील्याची घटना गुरूवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता समोर आली आहे. या संदर्भात सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यासंदर्भात मिळालेली माहिती अशी की, अमळनेर शहरातील राहणारे सुनील आनंदा पाटील वय-५४ यांची दुचाकी एमएच १९ ईबी २१४४ आणि जितेंद्र काशिनाथ मोरे यांच्या घरासमोर लावलेली दुचाकी (एमएच १९ डीएन २८७) या दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी २ ऑक्टोबर रोजीच्या मध्यरात्री चोरून नेल्या. ही घटना दुसऱ्या दिवशी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीला आले. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सुनील पाटील आणि जितेंद्र मोरे यांनी दुचाकीचा शोध घेतला. परंतु त्यांना दुचाकीबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही, अखेर सुनील पाटील यांनी अमळनेर पोलिसात गाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी ७ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहे.