जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोरून एकाच ठिकाणाहून ५० हजार रूपये किंमतीच्या दोन दुचाकींची चोरी झाल्याचे २ एप्रिल रोजी उघडकीला आल. रात्री उशीरापर्यंत नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, विनोद भागवत रंधे (वय-४७) रा. स्वातंत्र्य चौक, नशिराबाद हे मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. १ एप्रिल रोजी नशिराबाद बसस्थानक परिसरातील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयासमोर असलेल्या मोकळ्या जागेत रात्री १० वाजता (एमएच १९ सीक्यू १८९१) क्रमांकाची दुचाकी लावली होती. त्याच परिसरात राहणारे फकिरा पंडीत मराठे यांनी देखील त्यांची (एमएच १९ एबी २१२५) दुचाकी मोकळ्या जागेत दुचाकी पार्किंगला लावली. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी ५० हजार रूपये किंमतीच्या दोन्ही दुचाकी चोरून नेल्याचे २ एप्रिल रोजी सकाळी उघडकीला आले. दिवसभर दुचाकींची शोधाशोध करून न मिळाल्याने विनोद रंधे यांच्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.