शेतातून लांबविल्या सोलार पॅलनच्या प्लेटांची चोरी

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । अमळनेर तालुक्यातील लोंढवे शिवारातील शेतातून २० हजार रूपये किंमतीचे सोलार पॅनलची चोरी झाल्याची घटना २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रभान रावण पाटील वय ४८ रा लोंढवे ता.अमळनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. त्याचे लोंढेवे शिवारात शेत आहे. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करतात. दरम्यान. २३ ते २४ जुलै दरम्यान त्यांच्या शेतातून अज्ञात चोरट्यांनी सोलार पॅनलच्या प्लेटांची चोरी केल्याची घटना समोर आली. याबाबत चंद्रभान पाटील यांनी सर्वत्र शोध घेवून माहिती जाणून घेतली असता कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी गुरूवारी ८ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वा दोन वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कैलास शिंदे हे करीत आहे.

Protected Content