जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अहुजा नगर स्टॉपजवळ मोकळ्या जागेत लावलेल्या पोकलॅण्ड मशीनचे पार्ट अज्ञात चोरट्यांनी काढून चोरून नेल्याची घटना सोमवार १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आले. याबाबत बुधवारी २० डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, तुषार दिलीप मोरे ( वय-३४, रा.अहुजा नगर, वृंदावन अपार्टमेंट, जळगाव) हे पोकलॅण्डचा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करत असतात. १५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांच्या मालकीचे पोकलॅण्ड मशीन अहुजा नगरातील स्टाफ जवळ मोकळ्या जागेत लावलेले होते. दरम्यान १५ डिसेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ७० हजार रुपये किमतीचे दोन पार्ट पोकलॅंडचे मशीनमधून काढून चोरून नेले. हा प्रकार १८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता समोर आल्यानंतर मालक तुषार मोरे यांनी याबाबत सर्वत्र माहिती घेतली असता त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी बुधवारी २० डिसेंबर रोजी रात्रीं ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याने विरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ अनिल फेगडे हे करीत आहे.