Home क्राईम रसलपूर येथे पशुधनाची चोरी; पंधरा हजाराचा गो-हा चोरला

रसलपूर येथे पशुधनाची चोरी; पंधरा हजाराचा गो-हा चोरला


रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील रसलपूर येथे शनिवार, दि २ जुलै रोजी अज्ञात चोरट्याने गो-हा चोरुन नेल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

सचिन भास्कर धनके यांचा मालकिचे १५ हजार किमतीचे पशुधन असलेला गोऱ्हा त्यांच्या घरासमोर बांधलेला होता. अज्ञात चोरट्याने त्या गोऱ्ह्याला चोरुन नेले आहे.

या बाबत अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. सतिश सानम करीत आहे. परिसरात वाढत्या चो-यांमुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.


Protected Content

Play sound