यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील विस्तारित भागातील आयशानगर परिसरात राहणारे कुटुंब हे बाहेरगावी गेल्याचे पाहुन अज्ञात चोरट्यांनी घरातील कोंडे वाकऊन सुमारे एक ते दीड लाख रुपयांची धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की, शहरातील विस्तारित भागातील वसाहतीत राहणारे सैय्यद साबीर सेय्यद मरू वय ५० वर्ष हे आपल्या कुटुंबासमवेत राहतात ते दिनांक २० रोजी सुरत येथे नातेवाईकाकडे गेले असता घरी कुणीच नसल्याचे पाहुन चोरट्यांनी संधी साधुन घराचा दरवाज्याच्या कोंडया वाकवुन घरात प्रवेश करून घरातील कपाटातील मुलीच्या लग्नासाठी आणुन ठेवलेले दागीने व रोख रक्कम असा सुमारे एक ते दिड लाखांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडती आहे.
घरी कुणीही नसतांना दरवाजा उघडा दिसल्याने शेजरच्या मंडळीने घरात पाहीले असता हा चोरीचा प्रकार उघडकीस आला, चोरीचे वृत्त कळताच नागरीकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. सदरच्या घटनेची माहीती मिळताच पोलीसांनी धाव घेत पंचनामा केला आहे. परिसरात गेल्या काही दिवसांपासुन चोरट्यांचा वावर वाढल्याचे रहीवाशांकडून बोलले जात असुन पोलीसांनी विस्तारीत वसाहती मध्ये रात्रीची गस्त वाढवावी अशी मागणी होत आहे .