जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील गणेश कॉलनीतून एकाची मोटारसायकल अज्ञातांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रूपेश चंद्रकांत शेलार (वय-२३) रा. गणेश कॉलनी,जळगाव हा तरूण शिक्षण घेत आहे. त्यांच्याकडे त्यांच्या मित्राची मोटारसायकल (एमएच १९ डीडी १२०६) आहे. महाविद्यालय आणि शिकवणीसाठी तो त्या मोटारसायकलचा वापर करतो. दरम्यान, २५ मार्च रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरासमोर पार्क करून लावलेली २० हजार रूपये किंमतीची मोटारसायकल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. मोटारसायकलचा सर्वत्र शोध घेतला परंतू कुठेही मोटारसायकल आढळून आली नाही. अखेर शनिवार १४ मे रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.