जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटेनगर येथील अल्हाद बाईज हॉस्टेल येथून विद्यार्थ्यांच्या खोलीतून मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना शनिवारी २७ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील खोटे नगर येथील अल्हाद बाईज होस्टेल येथे सैय्यक मोहम्मद तलहा मोहम्मद हानिफ वय २३ रा. शेवगाव जि. नगर हा तरूण शिक्षणासाठी राहत आहे. शनिवारी २७ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरटयाने सैय्यद मोहम्मद आणि इतर विद्यार्थ्यांच्या खोलीतून मोबाईल, टॅब आणि लॅपटॉप असा एकुण ४० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही बाबत सकाळी ७ वाजता उघडकीला आला. याप्रकरणी दुपारी दीड वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गुलाब माळी हे करीत आहे.