जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील तांबापूरा भागातील पंचशिल नगरातील तरूणाचे बंद घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करून घरातून ६६ हजार रूपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकडची चोरी केल्याची घटना शुक्रवारी १७ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता उघडकीला आले. याप्रकरणी शनिवारी १८ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नुर मोहम्मद शेख जब्बार वय २३ रा. पंचशिल नगर, तांबापूरा जळगाव हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बुक स्टॉल लावून तो आपला उदरनिर्वाह करतो. शुक्रवारी १७ जानेवारी रोजी रात्री १ ते सकाळी दुपारी १ वाजेच्या दरम्यान तरूणाचे घर बंद होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोकड असा एकुण ६६ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर तरूणाने पोलीसांशी संपर्क साधून माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी १८ जानेवारी रोजी मध्यरात्री १ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके हे करीत आहे.