बांधकाम व्यावसायिकाच्या चारचाकी वाहनाची चोरी

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील प्रताप नगरातून बांधकाम व्यावसायीकाची चारचाकी वाहन घरसमोरून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले आहे. याप्रकरणी सोमवारी २० जानेवारी रोजी दुपारी २ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील प्रताप नगरात बांधकाम व्यावसायिक विपुलकुमार पोपटलाल शहा वय ५८ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. शनिवारी १८ जानेवारी रोजी रात्री ९ वाजता त्यांनी त्यांची मालकीची चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ एई ५७१०) ही त्यांनी त्यांच्या घरासमोर पार्कींगलला लावलेली होती. दरम्यान मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पार्कींगला लावलेली त्यांची चारचाकी वाहन चोरून नेले. ही घटना रविवारी १९ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता उघडकीला आले. त्यांनी वाहनाचा सर्वत्र शोध घेतला परंतू त्यासंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही अखेर त्यांनी सोमवारी २० जानेवारी रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक सुवर्णा तायडे ह्या करीत आहे.

Protected Content