चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शिवारातील शेत गट क्रमांक १५२ मधील शेतातून महावितरण कंपनीच्या ५० हजार रूपये किंमतीच्या अल्यूमिनीअमच्या विद्यूत तारांची चोरी झाल्याची घटना १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी मंगळवारी १८ जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजता चाळीसगाव शहर पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, चाळीसगाव शिवारातील शेत गट क्रमांक १५२ मधील शेतात महावितरण कंपनीच्या मालकीच्या अल्यूमिनीअमचे विद्यूत तारा ठेवण्यात आलेल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी ह्या ५० हजार रूपये किंमतीच्या तारांची चोरी केल्याचे १० जून रोजी सायंकाळी ५ वाजता समोर आले आहे. हा प्रकार महावितरण कंपनीच्या अधिकारी विद्यूत सहाय्यक रामेश्वर वसंत सुर्यवंशी यांच्या लक्षात आली. त्यांनी आजूबाजूच्या शेतकऱ्यांना विद्यूत तारांबद्दल माहिती विचारली परंतू काहीही माहिती मिळाली नाही. अखेर मंगळवारी १८ जून रोजी दुपारी सव्वा दोन वाजता त्यांनी चाळीसगाव शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ दत्तात्रय महाजन हे करीत आहे.