रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पोलिस स्टेशनच्या हद्दीत अज्ञात चोरट्याने महावितरणचे सुमारे ४७ हजार रुपये किमतीचे अॅल्युमिनियमचे तार चोरून नेले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, रावेर तालुक्यातील उटखेडा शिवारात घडलेल्या या घटनेत, भाऊराव भागवत पाटील आणि विभाबाई यशवंत बाविस्कर यांच्या शेतातून महावितरण कंपनीचे ४७ हजार रूपये किंमतीचे विद्यूत तारांची चोरी झाली आहे. या प्रकरणी भारतीय विद्युत अधिनियम, कलम 136 अंतर्गत महावितरणचे प्रधान तंत्रज्ञ लिलाधर कोळी (वय 57) यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक यांच्या आदेशानुसार, या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सिकंदर तडवी यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.