पाल येथील शेतातून विद्युत तारांची चोरी

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर येथील शेतातून ५५ हजारांचा विद्युत पोल चोरीस गेले आहे. 16 विद्युत पोलवरील 14 गालेतील तार संशयित आरोपीने लबाडीच्या इराद्याने चोरुन नेल्याची घटना 30 जुलै रोजी घडली.चोरीमुळे परिसरातील शेतकऱ्यांना विद्युत पुरवठा खंडित होऊन मोठा आर्थिक फटका बसला आहे.

पाल शिवारात गणेश चव्हाण व मगन राठोड यांच्या शेतातील डी. पी. वरून 55,000/- रुपये किंमतीचे विद्युत पोल चोरीस गेले आहे. सुधाकर पवार (वय 29 वर्षे, व्यवसाय: विद्युत सहायक) यांनी अज्ञात आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर तपास पोहेकॉ जगदिश पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.सदर प्रकरणात पोलिसांनी चोरीस गेलेल्या सामग्रीचा तपास करण्यासाठी चौकशी सुरु केली आहे.

Protected Content