धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शिवारातील शेत गट नंबर ६३० मधील शेतातील विहिरीतून इलेक्ट्रिक केबल वायर आणि विद्युत तार असा एकुण ४० हजार ९०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना शनिवार २२ जून रोजी रात्री ८ वाजता समोर आले आहेत. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती अशी की, योगेश रामलाल पूरभे वय-५०, रा.मोठा माळीवाडा, धरणगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव आहे. दरम्यान त्यांचे धरणगाव शिवारातील शेत गट नंबर ६३० मध्ये शेत आहे. या शेतातील विहिरीजवळ असलेल्या इलेक्ट्रिक केबल वायर, विद्युत तारांची चोरी झाल्याचे समोर आले आहे. दरम्यान ही चोरी राहुल सिताराम पावरा वय-३५, रा, वरला ता, शेंदवा जि,बडवानी मध्यप्रदेश याने शनिवारी २२ जून रोजी रात्री ८ वाजता चोरी केल्याचे उघडकीला आले. दरम्यान या प्रकरणी योगेश पुरभे यांनी धरणगाव पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार रात्री ११ वाजता संशयित आरोपी राहुल पावरा यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र पाटील करीत आहे.