बांबरूड शिवारातून विद्यूत पंपाची चोरी

पाचोरा प्रतिनिधी । तालुक्यातील राणीचे बांबरूड शिवारातील विहिरीतून विद्यूत पंप आणि केबलची चोरी झाल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरूध्द गुन्हा  दाखल करण्यात आला आहे.

आकाश दत्तात्रय पाटील (वय-२६) रा. आसनखेडा ता. पाचोरा यांचे तालुक्यातील बांबरूड शिवारात शेत आहे. २१ मे सायंकाळी ६ ते २३ मे सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान त्यांच्या शेतातील विहिरीत असलेली ५ हजार रूपये किंमतीचा विद्यूत पंप आणि १ हजार रूपये किंमतीची केबल असा एकुण ६ हजार रूपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परीसरात शोधाशोध केली असता वस्तू मिळून आल्या नाही. आकाश पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मुकुंद परदेशी करीत आहे.

Protected Content