Home क्राईम नायगाव शिवारात ईलेक्ट्रिक केबल वायरची चोरी; यावल पोलीसात अज्ञातांवर गुन्हा दाखल

नायगाव शिवारात ईलेक्ट्रिक केबल वायरची चोरी; यावल पोलीसात अज्ञातांवर गुन्हा दाखल

0
30

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील नायगाव शिवारातील विहिरीतून इलेक्ट्रिक वायरची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना ३ ऑक्टोबर रोजी उघडकीला आली. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, प्रसन्न गुणवंतराव देशमुख (वय-४८) रा. नायगा ता. यावल हे शेतकरी आहेत. नायगावी शिवारात त्यांचे शेत आहे. शेती करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. शिवारातील शेतातील विहिरीजवळ असलेल्या इलेक्ट्रिक मोटारची दीड हजार रूपये किंमतीची वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची रविवारी ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आली. याप्रकरणी प्रसंन्न देशमुख यांनी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.


Protected Content

Play sound