Home क्राईम मनुर बुद्रुक शिवारातून ठिंबक नळ्यांची चोरी; बोदवड पोलीसात गुन्हा

मनुर बुद्रुक शिवारातून ठिंबक नळ्यांची चोरी; बोदवड पोलीसात गुन्हा


बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील मनुर बुद्रुक शिवारातील शेतातून ३५ हजार रूपये किंमतीचे ठिंबळ नळ्यांचे बंडल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, नाना रामभाऊ पाटील (वय-४५) रा. मनुर बुद्रुक ह.मु. गोरक्षण संस्था बोदवड ता. बोदवड यांचे मनूर शिवारात शेत आहे.  २९ एप्रिल रोजी रात्री ८ ते ३ मे रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी शेतातील ठिंबक कंपनीच्या नळ्या चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरात विचारपुस केली असता काहीच माहिती मिळाली नाही. नाना पाटील यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound