चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील रेल्वे ब्रिजच्या बाजूला मुंबई येथील इनकार्प पावर ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या मालकीची २ लाख ३३ हजार रुपये किमतीच्या तांब्याची तार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणे शनिवारी २२ जून रोजी दुपारी १.३० वाजता चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, चाळीसगाव शहरातील रेल्वे ब्रिजच्या बाजूला बायपास रोडवर मुंबई येथील इनकार्प पावर ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची मालकीची २ लाख ३३ हजार रुपये किमतीची ४६६ किलो वजनाची तांब्याची तार ठेवण्यात आली होती. हे तार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १२ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीला आली होती. या संदर्भात कंपनीचे मॅनेजर घनश्याम मन्साराम यादव रा. आदर्श अपार्टमेंट चाळीसगाव यांनी शनिवारी २२ जून रोजी दुपारी दीड वाजता चाळीसगाव शहर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे करीत आहे.