जळगाव प्रतिनिधी । विजय कॉलनीतील अशोक बेकरी समोर महापालिकेच्या गोडावूनचे कुलूप तोडून गोडावून मधील ६ हजार रूपये किंमतीचे ईलेक्ट्रिक चोक अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गणेश कॉलनी जवळील विजय कॉलनी परिसरात जळगाव महापालिकेच्या मालकीचे गोडावून आहे. अतिक्रमण विभागाने केलेल्या कारवाईत जप्त केलेल्या वस्तू याठिकाणी ठेवले जाते. ८ मे रोजी रात्री महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री ९ वाजता गोडावूनला कुलूप लावून निघून गेले. दरम्यान, मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी बंद गोडावून फोडून गोडावून मध्ये ठेवलेले ६ हजार रूपये किंमतीचे इलेक्ट्रिक चोक असलेले तांब्याचे तार चोरून नेले. हा प्रकार रविवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. महापालिकेचे कर्मचारी युवराज मेढे रा. दांडकर नगर यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप पाटील करीत आहे.