चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील बहाळ शिवारातील शेतातून तीन शेतकऱ्यांच्या गुरे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील बहाळ शिवारातील शेत गट नंबर ९६/२ मधून तीन शेतकऱ्यांच्या मालकीचे ६० हजार रूपये किंमतीचे गायी व गुरे चोरून नेल्याचा प्रकार २७ जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास उघडकीला आला आहे. येथील शेतकऱ्यांनी परिसरात शोधाशोध केली परंतू गुरांचा शोध लागला नाही. शेतकरी बापूर चत्रु सोनवणे (वय-४८ रा. रथाचे बहाळ, चाळीसगाव) यांनी मेहुणबारे पोलीस ठाण्यात धाव घेवून रितसर तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून मेहुणबारे पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल पाटील करीत आहे.