चोरगाव शिवरातून गुरांची चोरी; भुसावळ तालुका पोलीसात गुन्हा दाखल

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील चोरगाव शिवारातून चार गुरांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, प्रविण नथ्थू गुंजाळ (वय-४६) रा. चोरवड ता. भुसावळ हे शेतकरी असून शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. २० मे रोजी चोरवड गावालगत असलेल्या शिवारात त्यांच्या मालकीच्या दोन गाय, दोन गोऱ्हे त्यांनी बांधलेले होते. अज्ञात चोरट्यांनी ७७ हजार रूपये किंमतीची चार गुरांची चोरी केल्याचे २१ मे रेाजी सकाळी उघडकीला आले. परिसरात शोधाशोध करून त्यांनी गुरे मिळाली नाही. भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात प्रविण गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक गणेश राठोड करीत आहे. 

Protected Content