दिपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातून केबल वायरची चोरी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील दिपनगर औष्णिक विद्यूत केंद्रातून ५८ हजार रूपये किंमतीची पीव्हीसी इन्सूलेशनची केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १८ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता उघडकीला आली. याप्रकरणी गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील दिपनगर येथे औष्णिक विद्यूत केंद्र आहे. या केंद्राच्या आवारात अनेक ईलेक्ट्रीक केबल ठेवण्यात आले आहे. यातील पीव्हीसी इन्शूलेशनची केबल वायर ठेवण्यात आली होती. दरम्यान १७ ते १८ ऑगस्ट दरम्यानच्या काळात ५८ हजार रूपये किंमतीचे पीव्हीसी इन्शूलेशनची केबल वायर ही अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत विद्यूक केंद्राचे कार्यकारी अभियंता योगेश लक्ष्मण गमे यांनी गुरूवारी २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ तालुका पोलीसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश पालवे हे करीत आहे.

Protected Content