जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद भादली रस्त्यावरील महावितरण कंपनीच्या सबस्टेशनच्या शेडमधून ९० हजार रूपये किंमतीचे अल्युमिनीअमच्या तारांची चोरी केल्याची घटना बुधवारी १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी सायंकाळी ७.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नशिराबाद ते भादली दरम्यानच्या रस्त्यावर महावितरण कंपनीचे सबस्टेशन असून या ठिकाणी असलेल्या शेडमध्ये अल्युमिनीअमच्या विद्यूत तारा ठेवण्यात आल्या होत्या. १५ ते १६ ऑक्टोबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ९० हजार रूपये किंमतीच्या विद्यूत तारांची चोरी केली. ही घटना १६ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता समोर आली. याप्रकरणी सुपरवाझर हर्षल शिवाजी कदम वय ३० रा. खेडी ता.जळगाव यांनी सायंकाळी साडेसात वाजता नशिराबाद पोलीसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख हे करीत आहे.