Home क्राईम नशिराबाद येथून मध्यरात्री तरूणाच्या दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल

नशिराबाद येथून मध्यरात्री तरूणाच्या दुचाकीची चोरी; गुन्हा दाखल

bike thieves 20180259850
bike thieves 20180259850


जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद येथील मन्यार वाड्यातून ३० हजार रूपये किंमतीची तरूणीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. 

 

अधिक माहिती अशी की, तालुक्यात नशिराबाद येथील रहिवाशी शेख मोहम्मद लियाकत अब्दूल सत्तार (वय-२५) हा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान, ८ मे रोजी सायंकाळी दुचाकी (एमएच १९ सीएम ०५६२) ने घरी आले. मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजेच्या दरम्यान घरासमोर लावलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. परिसरातील शोधाशोध करून दुचाकी आढळून न आल्याने त्यांनी पोलीसात धाव घेतली. नशिराबाद पोलीस ठाण्यात शेख मोहम्मद यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गजानन देशमुख करीत आहे.


Protected Content

Play sound