बोदवड प्रतिनिधी । तालुक्यातील शेलवड शिवारातील दोन शेतकऱ्यांच्या शेतातून ठिबकच्या नळ्या, पाणबुडी आणि इलेक्ट्रिक वायर असा एकुण ६२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, कृष्णा शालिकराम जंगले (वय-३२) रा. वाकी ता. बोदवड आणि विश्वासराव राजाराम जवरे रा. शेलवड, मुक्तळ ता. बोदवड यांचे शेलवड शिवरात शेत आहे. २५ मे रोजी सायंकाळी ७ ते २६ मे रोजी सकाळी ८ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी शेतातील ठिबन नळ्यांचे बंडल, इलेक्ट्रिक पाणबुडी, इलेक्ट्रिक वायर असा एकुण ६१ हजार ९०० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. कृष्णा जंगले यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक उद्दल चव्हाण करीत आहे.