जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियमच्या एलपीजी प्लाण्टजवळून चोरट्यांनी ६१ घरगुती सिलेंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरातील भारत पेट्रोलियमच्या एलपीजी प्लाण्टमधून गॅस सिलिंडर वाहनांद्वारे पाठविले जातात. त्यानुसार १४ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता वाहनामध्ये गॅस सिलिंडर भरून ते प्लाण्टजवळ उभे होते. रात्रीतून अज्ञात चोरट्यांनी १ लाख २२ हजार रुपये किमतीचे ६१ सिलिंडर चोरून नेले. हा प्रकार शनिवारी १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आला. या प्रकरणी चालक शेख नाजीम शेख सत्तार (वय ३५, रा. नशिराबाद, ता. जळगाव) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




