जळगाव प्रतिनिधी । सुप्रीम कंपनीच्या लागून आलेल्या शेतातून ३० हजार रूपये किंमतीचे पीव्हिसी पाईपांची चोरी झाल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी काल १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सात वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, जफरोद्दिन रहिमोद्दिन पिरजादे (वय-७६) रा. जुना मेहरूण पिरजादेवाडा जळगाव हे शेतकरी असून सुप्रिम कंपनीच्या लागून त्यांची शेती आहे. १७ ऑगस्ट सकाळी ७ ते १८ ऑगस्टच्या सकाळी १० वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतात असलेल्या २५ हजार रूपये किंमतीचे २० फुट लांबीचे ३५ पिव्हीसी पाईप आणि ५ हजार रूपये किंमतीचे इतर साहित्य असा एकुण ३० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी जफरोद्दिन पिरजादे यांनी काल सायंकाळी पावणे सात वाजता एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सचिन मुंढे करीत आहे.